Members

विद्याधनं सर्व धनं प्रधानंम्

मॉन्टेसोरी बालक मंदिर शिक्षण संस्थेला आता ७० वर्षेपूर्ण होत आहेत . फार मोठी मजल मारली नाही तरी गुणात्मक दृष्ट्या नावलौकिक निश्चित मिळविला आहे . प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया तर आहेच परंतू तो सर्व जीवनाचा - आयुष्याचा पायाधार आहे . या वयात मुलं जे पहाते ,ऐकते ,शिकते त्याच्यावर घरात घराबाहेर जे संस्कार होतात त्यावर त्याचे पुढील जीवन यशस्वी ठरते . अर्थात हे यशस्वी जीवन होण्यासाठी संस्कार उत्तम व दृढ असावे लागतात .

शाळा मुलांना नुसते पुस्तकी शिक्षण देत नाही तर जीवनाचा सर्वांगीण विकासकसा होईल या कडे लक्ष देते . असे म्हणतात की , चांगला शिक्षक मुलांना शिकवीत नाही , परंतु त्यांच्या अंगात जे गुण असतात त्याच्या प्रकटीकरणाला मदत करतात . हे अंततः बरोबर असले तरी मुलांच्या बुद्धीला चालना देणे त्याला स्वत्वाची जाणीव करून देणे , जगात जे काही मंगल आहे ,स्फुर्तीदायक आहे , जीवनात स्पर्श करणारे आहे याचे ज्ञान करून देणे हे शिक्षकच करू शकतात . पालकांचाही यात मोठा हातभार असतो .

शाळेला चांगली दिमाखदार इमारत असणे हे महत्वाचे आहे , मोकळ्या हवेशीर खोल्या ,आरामदायी फर्निचर ई-लर्निंगची साधने ,कॅमेरे व इतर साधने यांची उपलब्धता करून दिलेली आहे . या सर्व सोयीमुळे व शिक्षकांच्या मेहनतीमुळे ही शाळा आदर्श शाळा होण्याकडे वाटचाल करीत आहे त्याचा प्रत्यय म्हणजे मुख्याध्यापिका श्रीमती मी. रा. गोसावी याना मिळालेला २०१६-२०१७ चा आदर्श शिक्षक पुरस्कार .

                                                                                                    अध्यक्ष

                                                                                                   - श्री म . ह . सावजी
                         

राज्य शिक्षक पुरस्कार 2015-16