Home

Welcome to Montessori Balak Mandir School

Here at MBM we aspire to create citizens of tomorrow. We provide quality education along with fun and meaningful activities which help students grow both in and out of classrooms.

Principal M.R.Gosavi

माझे ध्येय

ज्ञानरचनावादी विद्यार्थी घडविणे
भावी पिढीला सुजाण, संस्कारक्षम बनविण्यासाठी,
मी बदलाच्या ध्येयाने झपाटले होते ,आणि
गुलाबाची एक एक पाकळी अलगद उलगडावी
तशी मी नकळत शाळेत पूर्णपणे गुंतत गेले .
लहान मुलांना आकार घेतांना बघता बघता
लहानपण देगा देवा हे स्वप्न पुन्हा जगत गेले,
त्यांना घडवताना स्वतः नव्याने घडत गेले.
म्हणून किती उगवलं आणि किती उरलं
याचा विचार मी कधी केलाच नाही. .
मी फक्त पेरत गेले ......
ओंजळीत शिक्षणरस भरत गेले. . . . .
कारण माझ्या हातांनी काही तरी सुंदर घडावं
या ओढीने मी फक्त कर्म करत गेले
कुणाला तरी हातचे देत जावे
म्हणून मी दातृत्वाची बेरीज वाढवत गेले .
सर्वांच्या सहकार्याच फलस्वरूप म्हणून
आमची शाळा आज एवढया नावारूपाला आली. . . . .

                                                     

माझी शाळा

शालेय व्यवस्थेत मुख्याध्यापकाचे पद हे अनन्य साधारण आणि महत्वाचे आहे ,
प्रत्येक मुख्याधापक चांगला मुख्याध्यापक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो . 

त्यासाठी तो आपली शैक्षणिक क्षमता आणि प्रशासकीय कौशल्य वाढविण्याचे प्रयत्न करीत असतो .

आज शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ लागले आहे , गती - प्रगतीमुळे जग लहान झाले आहे , विद्यार्थीभिमुख अभ्यास ,त्यांचा अभ्यासक्रम ,शिक्षणात त्याला रस वाटावा , त्याला शिक्षणातून आनंदाची अनुभूती यावी यासाठी चाललेले सर्व प्रयत्न.

आमच्या संसंस्थेची स्थापना १९४९ साली झाली. आज संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर .

बालवाडी विभाग ,प्राथमिक विभाग , माध्यमिक विभाग अशा तीन विभागात शाळा चालते .

बालवर्ग ते दहावी पर्यंत संस्थेत एकूण २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहे . ७० ते ७५ प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे .
सर्व भौतिक सुविधांनीयुक्त , परिपूर्ण अशी डिजिटल व उपक्रमशील अशी आमची शाळा आहे.

                                                                                                                    -सौ. मी .रा. गोसावी 

                                                                                                                                  (मुख्याध्यापिका) 

Visitor Count